

What is the Real Volume of Illegal Murum Excavation in Alegaon Paga? Environmentalists Question Official Figures
Sakal
न्हावरे : आलेगाव पागा (ता. शिरूर) परिसरातील आलेगाव पाझर तलाव येथील कथित अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. महसूल विभागाच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात केवळ २४६ ब्रास मुरूम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज पुन्हा न्हावरे आऊट पोस्टचे सहाय्यक फौजदार शिवाजी भोते, आलेगावचे ग्राममहसूल अधिकारी आदित्य गायकवाड व आलेगावचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्यात आला. मात्र, या कारवाईनंतरही प्रत्यक्ष किती मुरूम उपसला गेला. याचा संपूर्ण हिशेब समोर आला आहे का येणार आहे का ? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.