Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

Waste Management : आळेफाटा बायपास परिसरात पुणे–नाशिक महामार्गालगत प्लॅस्टिक आणि घनकचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Plastic and solid waste piled up along the Pune–Nashik Highway near Alephata Bypass, causing foul odour and sanitation concerns.

Plastic and solid waste piled up along the Pune–Nashik Highway near Alephata Bypass, causing foul odour and sanitation concerns.

esakal

Updated on: 

राजेश कणसे

आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घनकचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, या मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com