

Impersonation Fraud: Fake Talathi Targets Senior Citizens
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : तलाठी असल्याची बतावणी करून जेष्ठ महिलांना फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आळेफाटा पोलीसांनी केली अटक. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासाबाई संतु डोंगरे वय ६८ वर्षे रा. डोंगरवाडी, काताळवेढे ता. पारनेर जि अहिल्यानगर या कामानिमित्ताने दि.२४ डिसेंबर २५ रोजी बेल्हा या ठिकाणी आल्या असता त्यांना एका अनोळखी इसमाने सांगितले की मी तुमच्या गावचा तलाठी असून तुमच्या घरी आलेलो असुन तुमची पेन्शन चालु आहे का व वाढीव पेन्शन जमा झाली आहे.