

Daytime House Burglaries in Junnar Taluka
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये दिवसा बंद घरे फोडणारे सराईत चोरटयांस जेरबंद करण्यास आळेफाटा पोलीसांना आले यश. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी( ता. जुन्नर) येथील पुनम अमित हांडे या दि. १२ डिसेंबर २५ रोजी घर बंद करून कामानिमित्ताने बाहेर गेल्या असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घराचा दरवाजाचे लावलेले कुलूप तोडुन घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याची नथ,कानातले,पायातले चांदीचे पैजन जोड असा एकुण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा हांडे यांनी गुन्हा नोंदविण्यात आला होता.