shri tuljabhavani mata palang
sakal
आळेफाटा - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा मानाच्या लाकडी पलंगाचे यादव कालीन परंपरेप्रमाणे राजुरी (ता. जुन्नर) या ठिकाणी गुरुवार दि. १ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जल्लोषात आगमन झाले. राजुरी येथील तिळवण तेली समाजातील कै. बाबुराव व आप्पा रामभाऊ शिंदे (मेहतर) या घराण्याकडे पलंगाची सेवा करण्याचा मान परंपरेने आहे.