मावळात पावासाचा जोर वाढल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्वाच्या तीनही धरणातून पाणी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडत आहे.

चोवीस तासात बुधवारी सकाळी वडगाव येथे ५४ मिलीमीटर, तळेगाव दाभाडे येथे ५० मिमी, कामशेत येथे १२४ मिमी, कार्ला येथे १५३ मिमी, पवनानगर येथे १०६ मिमी,  वडीवळे येथे ९६ मिमी, लोणावळा येथे २१० मिमी व शिवणे येथे २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.     

तालुक्यातील धरणे यापूर्वीच १०० टक्के भरल्याने व पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पहाटेपासून सर्व धरणातून पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. पवना धरणातून प्रतिसेकंद ६००० क्युसेक्स, वडीवळे धरणातून २५०० क्युसेक्स तर आंद्रा धरणातून प्रतिसेकंद १४०० क्युसेक्स याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert alert For village of river banks in Maval taluka due to increase of rainfall