अमृता विद्यापीठातर्फे विद्यार्थिनींसाठी अल्गोक्वीन कोडिंग स्पर्धा | Algoquin Coding Competition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amrita vishwa vidyapeetham
अमृता विद्यापीठातर्फे विद्यार्थिनींसाठी अल्गोक्वीन कोडिंग स्पर्धा

अमृता विद्यापीठातर्फे विद्यार्थिनींसाठी अल्गोक्वीन कोडिंग स्पर्धा

पुणे - विद्यार्थिनींमध्ये प्रोग्रॅमिंग आणि कोडिंगची जिज्ञासा वाढण्यासाठी अमृता विद्यापीठाच्यावतीने ‘अल्गोक्वीन कोडिंग’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अमेझॉन वेब सर्व्हिसेस, आय.बी.एम.क्यू आणि जेटब्रेन्स हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. सुरुवातीच्या दोन तिमाहीत ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा होणार आहे. यात चार फेऱ्यांचा समावेश असून सी., सी.सी.प्लस.प्लस आणि पायथॉन यावर आधारित प्रश्न असतील.

स्पर्धेची प्रश्नावली अमृता विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या मुलींनी तयार केली आहे. ही स्पर्धा देशाच्या सर्व शाळांमधील मुलींसाठी गटनिहाय आहे. एका गटात जास्तीत जास्त दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. विद्यार्थिनींमधील आत्मविश्वास वाढावा म्हणून मुख्य स्पर्धेपूर्वी ऑनलाइन वर्कशॉपच्या आयोजनही केले आहे. जानेवारी २०२२ मध्ये ही स्पर्धा होणार असून डिसेंबर २०२१ पर्यंत नावनोंदणी करता येईल. पूर्व परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क amrita.edu/jeecc आणि amritacbtpractice.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

loading image
go to top