esakal | रविवारपर्यंत राज्यातील सर्व न्यायालये राहणार बंद; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

court

कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारचे न्यायालये देखील आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

रविवारपर्यंत राज्यातील सर्व न्यायालये राहणार बंद; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारचे न्यायालये देखील आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. या आठवड्यात न्यायालयांना चार दिवसांची अतिरिक्त सुटी देण्यात आली आहे. मात्र सुटीच्या काळात रिमांडवर सुनावणी होईल. त्यामुळे नियमित सुनावणी आता थेट सोमवारपासून (१९) सुरू होणार आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्‍णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे संचारबंदीसारखे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात न्यायालयातील गर्दी कमी व्हावी म्हणून कामकाजाच्या वेळा देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता दोन शिफ्टमध्ये केवळ चार तास सुनावणी सुरू आहे. दरम्यान या आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस सुटी (गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) असल्याने चारच दिवस कामकाज होणार होते. त्यामुळे उर्वरित चार दिवस देखील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार (ता.१२), गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी (ता. १५ ते १७) देखील न्यायालयांना सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​
दरम्यान या सुटीच्या दिवशी तारखा असलेल्या दाव्यांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच चार अतिरिक्त सुट्या दिल्याने चार दिवसांचे कामकाज पुढे भरून काढायचे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार चार दिवस अतिरिक्त कामकाज करण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात नमूद आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून उच्च न्यायालयाने न्यायालयास सुटी दिली आहे. त्यामुळे आपण घरी सुरक्षित राहावे. न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशन आणि दी पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनने वकील व पक्षकारांना केले आहे.