उद्धट येथे सर्व रोग निदान शिबिर

उद्धट येथे सर्व रोग निदान शिबिर

Published on

उद्धट, ता. २ : उद्धट (ता. इंदापूर) येथे श्री ओम दत्त संस्थान ट्रस्ट उद्धट यांचे संस्थापक गुरुवर्य अण्णा पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण व सर्व रोग निदान तसेच उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या ठिकाणी डॉ. विशाल कदम यांनी सेवा दिली.
पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व इतर उपक्रम राबविले जातात. यामध्ये गरजूंना उपचार व आरोग्याविषयक साधनांचे मोफत वाटप या ट्रस्टद्वारे होते. यावेळी चष्मे वाटप केले. तसेच, इतर रोगांवरील उपचारांसाठी बारामती येथील महिला हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली होती.
या ट्रस्टद्वारे रक्तदानाचा महायज्ञ सुद्धा दरवर्षी साजरा करण्यात येतो. याबरोबरच दरवर्षी एक तारखेला भव्य वृक्षारोपण साजरा करण्यात येते. यावेळी गावामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश ट्रस्टद्वारे देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com