प्रवासी वाहतुकीसाठीही आता ‘ऑल इंडिया परमिट’; ८ लाख बस व्यावसायिकांना दिलासा

बस ॲंड कार ऑपरेटर्स कॉन्फडरेशन ऑफ इंडियाचे (बोकी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रसन्न पटर्वधन, राज्य प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Bus
BusSakal

पुणे - कॅब, मिनी बस आणि प्रवासी बसला (passenger transport) ऑल इंडिया परमिटसाठीचे (All India Permit) वार्षिक कर केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे नुकतेच निश्चित केले. त्यामुळे राज्या-राज्यात वाहनचालकांना प्रत्येक राज्यात कर देण्याची आवश्यकता राहिली नसून त्यांची आर्थिक बचतही होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून वाहतूकदार संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. देशातील सुमारे ८ लाख बस व्यावसायिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. (All India Permit now also for passenger transport Relief to 8 lakh bus operators)

बस ॲंड कार ऑपरेटर्स कॉन्फडरेशन ऑफ इंडियाचे (बोकी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रसन्न पटर्वधन, राज्य प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पटर्वधन म्हणाले, ‘‘प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय देशभर पसरला आहे. मात्र, प्रत्येक राज्यात प्रवेश करताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस अथवा कारचालकाला त्या- त्या राज्याचा कर भरावा लागत होता. त्याची रक्कम जास्त होती. त्यामुळे वाहतूक व्यावसायिकांना परवडत नव्हते. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला ज्या प्रमाणे नॅशनल परमिट दिले जाते, तशी सुविधा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना देण्यात यावी, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर ती मान्य झाल्यामुळे वाहतूक व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.’’ आता राज्य सरकारनेही त्यांचे कर कमी करण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Bus
सेट परीक्षा २६ सप्टेंबरला होणार

प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना या पूर्वी प्रत्येक राज्यात सात ते दहा दिवसांच्या तात्पुरत्या परमिटसाठी प्रती बस १० ते २१ हजार रुपये कर भरावा लागत. राज्यागणिक हा कर बदल होता. त्यामुळे बस व्यावसियांना आर्थिक भुर्दंड पडत, अप्रत्यक्षरित्या प्रवाशांना तो सहन करावा लागत असे. आता बस अथवा कार व्यावसियायिकांनी आता एकदा ऑल इंडिया परमिट घेतले की, त्यांना देशभर वाहतूक करता येणार आहे. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर त्यांनी परमिटसाठी अर्ज करायचा आहे तेथेच त्याचे शुल्कही भरायचे आहे. त्यातून केंद्र सरकारमार्फत प्रत्येक राज्य सरकारला विशिष्ट रक्कम मिळणार आहे. पुण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ससाणे यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा ऑल इंडिया परमिटसाठी वाहतूक व्यावसियाकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ऑल इंडिया परमिटचे एक वर्षासाठीचे करपत्रक

वाहनाचा प्रकार ------------------------- परमिट शुल्क -----------वातानुकूल वाहनासाठी कर ----------साध्या वाहनासाठी कर

नऊपेक्षा कमी प्रवासी क्षमता असलेली वाहने-------५००---------------------२५ हजार रुपये---------------१५ हजार

दहा किंवा २३ पर्यंत प्रवासी क्षमता असलेली वाहने--७५०---------------------७५ हजार रुपये ---------------५० हजार

२३ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेली वाहने ----१०००-----------------------३ लाख रुपये ---------------२ लाख रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com