नारायण पेठ - राम नाईक यांना पुरस्कार प्रदान करताना पद्मनाभ आचार्य. या वेळी (डावीकडून) धनंजय बर्वे, आचार्य, नाईक, डॉ. द. रा. केतकर आणि डॉ. सुरेश पळसोदकर.
नारायण पेठ - राम नाईक यांना पुरस्कार प्रदान करताना पद्मनाभ आचार्य. या वेळी (डावीकडून) धनंजय बर्वे, आचार्य, नाईक, डॉ. द. रा. केतकर आणि डॉ. सुरेश पळसोदकर.

देशाची सर्व अंगे समृद्ध करणे गरजेचे - पद्मनाथ आचार्य

Published on

पुणे - ब्रिटिश अधिकारी मेकॉले याच्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था बिघडली आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये संशोधने होतात. त्याचा समाजासाठी किती उपयोग होतो, याचा विचार करावा लागेल. भारताला समृद्ध आणि सशक्त करायचे असेल, तर देशाची सर्व अंगे समृद्ध करावी लागतील, असे मत नागालॅंडचे माजी राज्यपाल पद्मनाथ आचार्य यांनी व्यक्त केले. 

पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या ‘चरैवेती चरैवेती’ या पुस्तकाला कै. ना. ह. आपटे स्मरणार्थ पुरस्कार, तर डॉ. द. रा. केतकर यांच्या ‘भारतीय नौकानयनाचा इतिहास’ या पुस्तकाला कै. ना. के. बेहेरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी आचार्य बोलत होते. नाईक, डॉ. दरेकर यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, डॉ. सुरेश पळसोदकर आणि डॉ. अनुजा कुलकर्णी उपस्थित होते. 

नाईक म्हणाले, ‘‘मुंबईतील एका निवडणुकीत एका केंद्रावर मला फक्त दोन मते मिळाली. ती वस्ती कुष्ठपीडितांची होती. मी निवडून आलो, तर अवैध दारूविक्री करू देणार नाही म्हणून त्यांनी मते दिली नाही. मग त्यांच्यासाठी काही तरी करावे म्हणून प्रयत्न सुरू केला. उत्तर प्रदेशातील तत्कालीन सरकारला सांगून त्यांना अडीच हजार रुपये भत्ता सुरू केला. घरे उभारणीसाठी प्रयत्न केला. महाराष्ट्रातही त्यांच्यासाठी घरे उभारण्याची सूचना मागील सरकारला केली होती. कुष्ठ पीडितांसाठी काम केले, याचा  आनंद आहे.’’
डॉ. केतकर म्हणाले, ‘‘सागरी कथांचे लेखक फार तयार झाले नाहीत. त्यामुळे नौकानयनावर मराठीत फार लेखन नाही म्हणून हा विषय निवडला.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com