पुणे शहरातील संपुर्ण पाणी पुरवठा राहणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply close

पुणे महापालिकेच्या शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (ता.19) संपुर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Water Supply : पुणे शहरातील संपुर्ण पाणी पुरवठा राहणार बंद

पुणे - महापालिकेच्या शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (ता.19) संपुर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.20) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्‍यता आहे, त्याची नोंद नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या पर्वती, लष्कर, होळकर, भामा आसखेड, वारजे, वडगाव व कोंढवे धावडे जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता.19) काही पेठांसह उपनगरांमधील काही भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. पाणी पुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा परिसर

* पर्वती (एमएलआर) टाकी परिसर - गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ

* पर्वती (एचएलआर) टाकी परिसर - सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर, अप्पर इंदिरानगर, बिवेवाडी गावठाण, प्रेमनगर आंबेडकर नगर, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, पद्मावती, तळजाई

* पर्वती (एलएलआर) - शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट.

* लष्कर जलविद्युत केंद्राअंतर्गत येणारा भाग - हडपसर, कोरेगाव पार्क, रामटेकडी, वानवडी, हांडेवाडी, महम्मदवाडी, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, पुणे कॅन्टोन्मेंट, फुरसुंगी, खराडी, वडगावशेरी, मंगळवारपेठ, येरवडा गाव,

*नवीन व जुने होळकर जलकेंद्र - मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, एमईएस, एचई फॅक्‍टरी,

* भामा आसखेड केंद्राअंतर्गत येणारा परिसर - लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी.

* वारजे केंद्राअंतर्गत परिसर - पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, डावी भुसारी कॉलनी, सुतारवाडी, सुस रोड, सोमेश्‍वरवाडी, कर्वेनगर गावठाण, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी,वारजे जकात नाका, कर्वेनगर.

* गांधी भवन टाकी परिसर - कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, वारजे माळवाडी परिसर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरुड वॉर्ड ऑफिस परिसर, सहजानंद, गांधी स्मारक परिसर, कर्वेनगर, कॅनोल रस्ता

* पॅनकार्ड क्‍लब टाकी परिसर - बाणेर, बाणेर गावठाण, बालेवाडी, धानेर गावठाण, मेडिपॉइंट रोड आदी.

* एसएनडीडी व चतुःशृंगी टाकी परिसर - गोखलेनगर, औंध, बोपोडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बझार परिसर, डीपी रस्ता, मयूर कॉलनी परिसर, दशभूजा गणपती स्टॉप, वारजे वार्ड ऑफिस परिसर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर आदी.

* एसएनडीटी टाकी परिसर - गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यु कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बॅंक कॉलनी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, भोसले नगर, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट.

*कोंढवे धावडे कलकेंद्र परिसर - वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे धावडे न्यू कोपरे

* वडगाव जलकेंद्र परीसर - हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव-बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 आदी.

टॅग्स :puneWater supply