पुणे - महापालिका निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली, त्याची कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून, घरोघरी जाऊन तुम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडा. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.