congress mns shivsena
sakal
पुणे - काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आघाडीत जागा वाटप निश्चित झाले असताना प्रत्यक्षात तिन्ही पक्षांकडून उमेदवारी वाटताना जादा ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आल्याने बिघाडी झाली आहे. हीच परिस्थिती शिवसेना-भाजपमध्ये झाल्याने युतीमध्ये कुस्ती झाली आहे. त्यामुळे यावर मार्ग कसा काढायचा, अशा प्रश्न सर्वच पक्षांपुढे उभा राहिल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.