ganesh Bidkar and Amol Balwadkar
sakal
पुणे - कोथरूड मतदारसंघात केलेल्या कामाचे ऑडिट करावे असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीमध्ये केला होता. त्यावरून आज महापालिकेच्या सभागृहात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजप नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने बालवडकर यांना अर्थसंकल्पात देण्यात आलेला १२ कोटींचा निधी भाजपने काढून घेऊन त्यांचे अर्थसंकल्प शून्य केले. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी संतापून ‘यापुढे आपली मैत्री राज्यात असेल, पुणे महापालिकेत नाही’ असे वक्तव्य केल्याने सभागृहातील वातावरण तापले.