ग्राहक खायला येईनात, बारला परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

ग्रामीण भागातील हॉटेल हे शक्यतो मोठ्या प्रमाणावर असल्याने आसन क्षमता हीदेखील जास्त असते त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन तंतोतंत केले जाते. म्हणूनच खाद्य विक्रीसाठी परवानगी दिली आहेच तर त्या बरोबर ग्रामीण भागात बार चालविण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही आंदोलनाचे शस्त्र उचलणार आहोत. असा इशारा मुळशी तालुका हॉटेल बार असोसिएशनचे अध्यक्ष माऊली सातपुते तसेच उपाध्यक्ष अतुल इंगवले यांनी केला.

कोळवण : कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण जग ग्रासले आहे. आपल्या देशात व राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र  रोजगार निर्मिती करून देणाऱ्या हॉटेल व्यवसायास शासनाकडून 33 टक्के उपस्थितीत ग्रामीण भागात शासनाने खाद्य विक्री साठी परवानगी दिली आहे मात्र, बार चालविण्यासाठी परवानगी न दिल्याने ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे बारचालकांचे उत्पन्न काहीच नाही मात्र बँकेचे हप्ते, एक्साईज कर, जी.एस.टी, व्हॅट, एम. एस. ई. बी.  बिल, कामगारांचे पगार याचबरोबर जागामालकांना सोबत असलेल्या भाड्याचा बोजा कमी न झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याने अनेक विनंती करून देखील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न दिल्याने त्रस्त होऊन हॉटेल व्यावसायिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हॉटेल चालक मार्च ते सप्टेंबर असे एकूण सात महिने व्यवसायापासून वंचित राहिलेलो आहोत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने किमान ग्रामीण भागातील हॉटेल व बार सुरू करण्याची शासनाने परवानगी द्यावी. त्यामुळे आमच्यावरची ओढवणाऱ्या आर्थिक  संकटातून आमचा बचाव होईल व आमच्या कुटुंबाचा किमान उदरनिर्वाह सुरू होईल. हॉटेल व्यवसायामुळे आमचे कुटुंब अडचणीत असून देखील आम्ही मुळशीतील हॉटेल व्यावसायिक हजारो कामगाररांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहोत मात्र आता आम्हाला यापुढे त्यांचा उदरनिर्वाह करणे शक्य होणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामीण भागातील हॉटेल हे शक्यतो मोठ्या प्रमाणावर असल्याने आसन क्षमता हीदेखील जास्त असते त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन तंतोतंत केले जाते. म्हणूनच खाद्य विक्रीसाठी परवानगी दिली आहेच तर त्या बरोबर ग्रामीण भागात बार चालविण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही आंदोलनाचे शस्त्र उचलणार आहोत. असा इशारा मुळशी तालुका हॉटेल बार असोसिएशनचे अध्यक्ष माऊली सातपुते तसेच उपाध्यक्ष अतुल इंगवले यांनी केला.

मुळशी तालुक्यातील बार बंद असल्यामुळे पाच हजार कामगारांना बेरोजगार व्हावे लागले आहे. त्याचा परिणाम थेट त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. कारण घरातील कर्ता बेरोजगार झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने बार सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा अतिशय उग्र आंदोलन करण्यात येईल.
- तुषार अमराळे (हॉटेल व्यावसायिक)

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow the bar to start demanding hotel businessman

टॉपिकस
Topic Tags: