'आम्हालाही व्यवसाय सुरु करायचाय'

राजेंद्र मारणे
बुधवार, 1 जुलै 2020

पुणे जिल्हा व शहरातील डी. जे., मंडप, सजावट व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.

भुकूम : पुणे जिल्हा व शहरातील डी. जे., मंडप, सजावट व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. गणपती, दहीहंडी, लग्न, सण समारंभावेळी व्यावसायिकांना परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा संघटनेच्या भूगाव (ता. मुळशी) येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेली तीन महिने हा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी ही बैठक आयोजित केली होती. संघटनेचे अध्यक्ष सागर सुतार, ऍड. सुनिल ओव्हाळ, विजय दगडे, उमेश गावडे, पप्पू माझीरे, यश भिलारे, निरंजन आवाळे उपस्थित होते. यावेळी व्यावसायिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. व्यवसायासाठी कोणतीही बँक कर्ज देत नाही. स्वत:ची इस्टेट विकून, बाहेरील ज्यादा व्याज दराचे कर्ज घेऊन व्यावसाय सुरू केले. भाड्याची जागा घेतली. आजच्या परिस्थितीत व्यवसायच नसल्यामुळे भाडे देता येत नाही. कामासाठी असलेले कामगार बेकार झाले. कर्जाला कंटाळून पुणे शहरातील दोन व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. शहर व जिल्ह्यातील सर्वच व्यावसायिक मोठ्या अर्थिक अडचणीत आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगामी दहीहंडी व गणेश उत्सवात या व्यावसायिकांना परवानगी द्यावी. शासनाचे सर्व आदेश पाळून व्यवसाय करू. मिरवणूकीत एकाच जागी डीजे लावण्यात येईल. शासनाने सर्व व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आमच्या व्यावसायिकांचा विचार करावा. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून निवेदन देण्याच बैठकीत ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow us to start a business says Bhugaon Union Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: