esakal | पुणेकरांनो, नदीपात्रातील रस्ता बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

rain.jpg

पुण्यातील महत्वाचा भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकीचा ताण पर्यायी रस्त्यावर आला आहे. शाळा - महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि कामास जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी वाहतूकीसाठी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

पुणेकरांनो, नदीपात्रातील रस्ता बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील महत्वाचा भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकीचा ताण पर्यायी रस्त्यावर आला आहे. शाळा - महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि कामास जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी वाहतूकीसाठी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

काल संध्याकाळपासून पुण्यातील काही भागात पाऊस सतत पडत आहे.खडकवासला धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता 27000 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडल्याने नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला. दरम्यान नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

पर्यायी रस्ते 
जंगली महाराज रस्ता, 
कर्वे रस्ता, 
टिळक चौक 
लाल बहादुर शास्त्री रस्ता
सिंहगड रस्ता
म्हात्रे पुल

loading image
go to top