

सोमाटणे, ता. २१ ः शेलारवाडी येथील अमरजाई देवी, सोमाटणे येथील चौराईदेवी, दारुंब्रे येथील वाघजाईदेवी येथे दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मावळासह देहूरोड, पिपंरी-चिचवड येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू देवस्थान शेलारवाडी येथील अमरजाईदेवी येथे दर्शनासाठी पहाटे भाविकांनी हजेरी लावल्याने मुंबई-पुणे महामार्गापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व भाविकांना दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहुमामा शेलार, उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, सचिव शरद शेलार, सुभाष माळी, नितीन जाधव आदींसह सर्व संचालक मंडळाच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. सोमाटणे गावचे जागृत देवस्थान चौराईदेवी मंदीरात रात्री दहा वाजेपर्यंत जंगलातील कठीण उभी चढण असलेल्या पाय वाटेने चालत जात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. चौराईदेवी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सुधीर मुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाच्या वतीने दररोज पहाटे महापूजा, अभिषेक, आरती, महाप्रसाद, हरिपाठ, भजन, प्रवचन, आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दारुंब्रे गावचे श्रद्धास्थान असलेल्या वाघजाईदेवी मंदिरात ट्रस्टच्या वतीने पहाटे महापूजा, अभिषेक, आरती, महाप्रसाद, भजन आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांची दर्शन व महाप्रसादाची सोय केली होती.
सोमाटणे ः चौराईदेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
PNE26W59847
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.