Sandip Bendre
sakal
कोळवण - शिरूर येथील आंबळे गावातील संदीप विलास बेंद्रे यांची राज्य शासनाच्या मोडी लिपीतील मजकुराचे मराठी व इंग्रजी भाषांतर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी ८१ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यश संपादन केले आहे. देशभरात मोडी लिपीतील ८० कोटीहून अधिक कागदपत्रे आहेत परंतू पुरेसे मोडी तज्ञ नसल्याने हा इतिहास कागदपत्रात बंदिस्त आहे.