संशोधक विद्यार्थ्यांना ‘बार्टी’कडून मोठा दिलासा

संशोधक विद्यार्थ्यांना ‘बार्टी’कडून मोठा दिलासा
Published on

पुणे, ता. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’च्या कमाल वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ करिता ही वयोमर्यादा ३५ वरून ४५ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ फक्त शैक्षणिक वर्ष २०२३ करिता एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पीएच.डी.साठी कायमस्वरूपी नोंदणी झालेल्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. या पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा, अशी माहिती संस्थेने दिली आहे. ‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ योजना २०१३ पासून राबविण्यात येत आहे. यानुसार एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी कायमस्वरूपी नोंदणी झालेल्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांकडून पीएच.डी. अधिछात्रवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३, २०२४ आणि २०२५ याकरिता एक ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित केली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३ करिता एक जून २०२३ ला संशोधक विद्यार्थ्याचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे, अशी अट नमूद केली होती. आता पीएच.डी. अधिछात्रवृत्ती वर्ष २०२३ करिता वयोमर्यादा ४५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com