dilip walse patil
sakal
मंचर - खरीप हंगामातील पावसाचा खंड, पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि पाणी व चारा टंचाईचे संकट लक्षात घेऊन आंबेगाव व जुन्नर तालुक्यांचा अखेर दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, त्यात या दोन्ही तालुक्यांचा समावेश आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.