

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव): तब्बल सव्वा महिन्यानंतर गावात गॅस टाक्या वितरण सुरू
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यात गॅस वितरणाचा बोजवारा ही बातमी सकाळ मध्ये सोमवारी( ता. ६) रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर आंबेगाव चे तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी याबाबत त्वरित चौकशी करून तातडीने गावात गॅस सिलेंडरचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे तब्बल सव्वा महिन्यानंतर बुधवारी (ता. ८) रोजी अवसरी खुर्द गावात गॅस टाक्या वितरणाची गाडी आली. गॅस ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.