

Power Cable Theft in Ambegaon: Wires Stolen from 10 Electricity Poles in Mandalewadi, Power Supply Work Disrupted
Sakal
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथील वीज उपकेंद्रावरून मांदळेवाडी येथे विजपूरवठा केला जाणार आहे. त्यासाठी वडगावपीर येथील बैलगाडा घाटापासून ते ढगेवस्ती पर्यंत विज खांब उभे केले असून त्या खांबांवरून हायटेन्शन विज तारा ओढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आता विजपूरवठा सुरळीत होणार अशी ग्रामस्थांची चर्चा सुरू असतानाच शनिवार ( दि.२२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भुरटया चोरांनी जवळ-जवळ दहा वीज खांबांवरील विज तारा काढून चोरून नेल्याने महावितरण बरोबरच महावितरणच्या ठेकेदारांचे मोठे नूकसान झाले आहे.