

मंचर, ता. १९ : आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘आरडीएसएस’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वीज खांब उभारणी व वाहिन्यांच्या कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. या कामांची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंपळगाव-निरगुडसर परिसरात उभारलेले लोखंडी वीज खांब सुरुवातीलाच तिरपे झाले असून, अनेक ठिकाणी ते रस्त्याच्या अगदी कडेला उभारले आहेत. यामुळे भविष्यात रस्ते रुंदीकरणात अडथळे येण्यासह अपघाताचा धोका वाढला आहे. खांब उभारताना आवश्यक सिमेंट काँक्रीटचा वापर न करता केवळ दगड टाकून काम उरकले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पावसाळ्यात खांब कोसळून वीजपुरवठा खंडित होण्याची भीती आहे. या कामांवर ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचेही बोलले जात आहे.
शासनाच्या कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या या कामांची गुणवत्ता तपासून दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
२४ तास वीजपुरवठ्यासाठी शासन मोठा खर्च करत असताना अनेक ठिकाणी खांब तिरपे व रस्त्यालगत उभारले आहेत. या कामांच्या दर्जाची सखोल चौकशी करून खांब रस्त्यापासून १०-१२ फूट अंतरावर उभारावेत.
- दीपक पोखरकर, सरपंच, पिंपळगाव
योजनेची सर्व कामे तांत्रिक निकषांनुसारच सुरू आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित ठिकाणांची पाहणी केली जाईल व आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही केली जाईल.
- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण, मंचर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.