

Road Issues in Forest Department Jurisdiction
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील वनविभाग हद्दीतील काही गावातील रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जुन्नर उपविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन संबधीत रस्त्यांबाबत चर्चा केली.