

मंचर(ता.आबेगाव): गॅस सिलेंडर टंचाईमुळे उत्तरप्रदेश कडे गावी निघालेले कुटुंब
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील सहा मान्यताप्राप्त वितरकांकडून सुमारे ६० हजार ९२५ घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडर पुरवठा केला जातो.मात्र, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही वितरकांकडून वितरणात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे.