

Crops and Cattle Fodder Nearing Wither as Check Dams on Ghod River Dry Up; Hardships for Farmers and Villagers
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील घोडनदीवरील बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे घोडनदी नदीवरील शेती पंप बंद पडल्याने शेतातील पिके तसेच जनावरांचा चारा पाण्याअभावी सुकू लागला आहे. आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याचा धोका आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने डिंभे धरणातून घोड नदीत पाणी सोडून बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील यांनी केली आहे.