

Illegal Tree Felling | Forest Department Seizes Two Vehicles in Ambegaon
esakal
घोडेगाव : घोडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आमोंडी आणि गिरवली परिसरात वनविभागाने धडक कारवाई करत अवैध वृक्षतोड आणि विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी दोन वाहने जप्त केली आहेत. या दोन्ही घटनांमध्ये संबंधितांविरोधात वनगुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी दिला आहे.