

Ambegaon Taluka Journalist Association protests against MP Sanjay Dina Patil
Sakal
मंचर : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथित गैरवर्तन करून शिवीगाळ व जोडे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा आंबेगाव तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ संघाच्या वतीने मंचर येथील प्रांत कार्यालयात शुक्रवारी (ता.२६) नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना निवेदन दिले.यावेळी जेष्ठ पत्रकार डी.के.वळसे पाटील,आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष नीलेश काण्णव, सचिव चंद्रकांत घोडेकर,सोशल मिडिया अध्यक्ष सचिन तोडकर, सुदाम बिडकर, जयेश शहा, अविनाश पवार,सीताराम काळे, विवेक शिंदे, रवींद्र वाळके, लक्ष्मण ढोबळे, विशाल करंडे,मोसीन काठेवाडी,मिलिंद भांगरे,निवेदक निलेश पडवळ उपस्थित होते.