Milk Adulteration Row: दूध भेसळ प्रकरणात माझा संबंध सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खुले आव्हान

दूध भेसळ प्रकरणात माझा किंचितही संबंध सिद्ध झाल्यास तात्काळ सार्वजनिक जीवनातून निवृत्ती; विरोधकांच्या आरोपांना दिलीप वळसे पाटील यांचे खुले आव्हान
Former Home Minister Dilip Walse Patil addresses the media through a video message in Ambegaon.

Former Home Minister Dilip Walse Patil addresses the media through a video message in Ambegaon.

Sakal

Updated on

मंचर : राज्यातील दूध भेसळ प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आंबेगावचे आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान देत आपली भूमिका स्पष्ट केली. "दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात माझा दूरान्वयानेही संबंध असल्याचे सिद्ध झाले, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून कायमची निवृत्ती घेईन," अशी घोषणा त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com