Education News: आंबेगावचा अभिमान: मोरडेवाडी शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची ESA व इस्रो भेटीसाठी निवड, नामवंत अंतराळ शास्त्रज्ञांशी संवादाची संधी

ग्रामीण भागातील मनस्वी मोरडे व अनुवेद ढोबळे यांची ESA व इस्रो भेटीसाठी निवड; नामवंत अंतराळ शास्त्रज्ञांशी संवाद, संशोधन केंद्रांना भेट व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
Mordewadi Zilla Parishad School students Manasvi Morde and Abhijit Dhobale selected for educational visits to ESA and ISRO, offering them an opportunity to interact with space scientists and explore advanced space technology.

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरडेवाडीच्या दोन विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. मनस्वी मोरडे हिची युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) तर अभिजीत ढोबळे याची इसरो भेटीसाठी निवड झाली आहे. अंतराळ संशोधन करणाऱ्या नामवंत शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची, संशोधन केंद्रांना भेट देण्याची आणि आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या यशामागे वर्गशिक्षिका कविता वळसे पाटील व शिक्षक बाळकृष्ण बेल्हेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com