
पारगाव : वय अवघे ३० वर्षे नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे हे वय. पण, नियतीला कदाचित त्याची आणखी परीक्षा पहाण्याची लहर आली. काही कळायच्या आतच त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे निदान झाले. अख्खे कुटुंब हादरले. कोलमडून पडण्याची वेळ आली. मात्र पुन्हा एक माता पुढे आली. कठोर झालेल्या नियतीमुळे वादळात चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी या मातेने आपले काळीज मोठे केले आणि स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर ओढून आणले. सुनील बन्सी मेंगडे असे या भाग्यवान तरुणाचे नाव आहे.