

Students casting votes during the Head Boy and Head Girl election at New English Medium School, Ambegaon
Sakal
घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, येथे विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक उत्साहात पार पडली. लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून हेड बॉय आणि हेड गर्ल यांची निवड मतदानाद्वारे करण्यात आली.