

From Farm to MD: Sheetal Shinde’s Remarkable Journey
Sakal
निरगुडसर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर निरगुडसर गावची शेतकरी कुटुंबातील सुकन्या शितल रंगनाथ शिंदे हिने सर्व अडथळ्यांवर मात करत हे यश मिळवले आहे.शितल शिंदेने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथून मास्टर ऑफ डॉक्टरेट (MD) पदवी मिळवली आहे,या परीक्षेत तिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले.