

Pune
esakal
महाळुंगे पडवळ: रयत शिक्षण संस्थेच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयातील विद्यार्थी संस्कार राजेश घायाळ (वय १८) हा सध्या "अग्निअस्त्र" या थ्रीडी प्रिंटेड क्षेपणास्त्र प्रकल्पावर संशोधन करत आहे. या संशोधनाची दखल घेत बंगळूरू येथील एका कंपनीने त्याला पुढील संशोधनासाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे.