आंबेगाव तालुक्यात एका दिवसात सर्वाधिक ३१ पॉझिटिव्ह; तालुक्याची संख्या पोहोचली...

Ambegaon taluka has the highest number of 31 Corona positives in a day
Ambegaon taluka has the highest number of 31 Corona positives in a day
Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यात बुधवारी (ता.२२) सर्वाधिक ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण ९ घोडेगावचे व मंचरचे ७ रुग्ण आहेत. आदिवासी भागात पाटण (कुशिरे) येथे प्रथमच रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची तालुक्यातील संख्या १८८ झाल्याने प्रशासन हतबल झाले असून नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कळंब, पोंदेवाडी प्रत्येकी दोन, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक चार, निघोटवाडी तीन, अवसरी व पेठ एक, अन्य एक खासगी हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला आहे. वाढत्या संसर्गामुळे यातून कसा मार्ग काढावा असे प्रश्नचिन्ह ग्रामपंचायत व प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील दररोज येथील उपाययोजनांची अंबलबजावणी, वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा याबाबत आढावा घेत आहेत. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, अवसरी खुर्दच्या सरपंच संगीता शिंदे, ग्रामविकास अधिकारी आर. टी गाढवे यांनी गावात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंबलबजावणी युद्ध पातळीवर सुरु केली आहे. तर, पिंपळगाव खडकीमध्ये या साथीची लागण होऊ नये म्हणून गावाने केलेल्या उपाय योजना व जनजागृती उपयुक्त ठरत असल्याची माहिती पिंपळगावच्या सरपंच अश्विनी बांगर यांनी दिली आहे.

मंचर शहराला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी चहुबाजूनी  घेरले आहे. मंचर शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. पोलीस व शिक्षक कार्माचाऱ्यांनाही लागण झाली आहे. त्यामुळे अन्य पोलीस व शिक्षकांचीही काळजी वाढली आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात व भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये संशायीत रुग्णांचे नमुने घेण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com