

Emergency Response: Tehsildar Sachin Wagh Inspects Storm Damage at Night
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला पोल्ट्री शेड , घरे , जनावरांचा गोठा, ग्रीन हाऊस तसेच शेतातील तरकारी पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार काल रात्रीच आठ वाजता तहसीलदार सचिन वाघ यांनी लाखणगाव परिसरातील नुकसानीची पहाणी करून पंचनाम्याचे आदेश दिले आहे.