Legacy of Pre-Independence Shila Bazar
Sakal
पुणे
Ambegaon News : स्वातंत्र्यपूर्व परंपरेचा जिवंत वारसा; वर्षातून एकदाच भरणारा वळतीचा शिळा बाजार!
Valati Village Shila Bazar : वळती (ता. आंबेगाव) येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला शिळा बाजार आजही मोठ्या उत्साहात भरतो. थापलिंग यात्रेनंतर भरणाऱ्या या बाजारात महिला व ज्येष्ठांची मोठी गर्दी होऊन लाखोंची उलाढाल झाली.
निरगुडसर : स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या शिळा बाजार भरण्याची परंपरा आजही कायम असून वळती (ता.आंबेगाव) येथील वर्षातून एकदाच भरणाऱ्या या शिळा बाजारात सोमवार (ता.०५) रोजी महीला,मुले जेष्ठांनी मोठी गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली . पौष पोर्णिमेला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला श्रीक्षेत्र थापलिंग यात्रोत्सव दोन दिवस असतो त्यानंतर तिसर्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो.थापलिंग गडावरचीच दुकाने तिसऱ्या दिवशी वळती गावात थाटली जातात म्हणून या बाजाराला 'शिळा बाजार' म्हणतात ही परंपरा आजही ग्रामस्थांनी टिकून ठेवली आहे.

