Valti Bhagd​i Road : आंबेगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी रस्ता अडवला; अज्ञात व्यक्तींनी दगड लावल्याने वाहनचालकांमध्ये भीती

Large Stones Placed Across Valti Bhagd​i Road in Ambegaon Taluka : आंबेगाव तालुक्यातील वळती ते भागडी रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्या वेळी मोठे दगड आडवे लावले. निर्जन वनहद्दीत घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक, नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून लुटमारीचा संशय व्यक्त केला जात आहे.
Large Stones Placed Across Valti Bhagd​i Road in Ambegaon Taluka

Large Stones Placed Across Valti Bhagd​i Road in Ambegaon Taluka

esakal

Updated on: 

निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती ते भागडी रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी रविवारी (ता.१५) रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे दगड आडवे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निर्जन वनहद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक,नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांची वाट अडवून लुटमारीच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असावा,असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...