कोल्हापूरः आंबेओहळ प्रकल्पातील पाण्याचे ‘राष्ट्रवादी’तर्फे पूजन

कोल्हापूरः आंबेओहळ प्रकल्पातील पाण्याचे ‘राष्ट्रवादी’तर्फे पूजन
Published on

आंबेओहळ प्रकल्पातील पाण्याचे ‘राष्ट्रवादी’तर्फे पूजन


उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-पास्टेवाडी (उत्तूर) दरम्यान उभारण्यात आलेल्या आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.

जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई म्हणाले, ‘‘दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प सलग सहाव्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्पातील पाण्याचा शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठीही मोठा लाभ होणार आहे.’’

पंचायत समिती सदस्य विकास चोथे, गणपतराव सांगले, गंगाधर हराळे, शंकर पावले, संजय येजरे, विजयराव वांगणेकर, रामदास साठे, सागर सरोळकर, संजय पवार, तुषार घोरपडे, संभाजीराव पाटील, विनायक तेली आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ तेली यांनी स्वागत केले. तानाजी डोंगरे यांनी आभार मानले.

Related Stories

Koyna water diversion project to Mumbai
Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns
Sangli flood risk due to Almatti Dam
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com