
आंबेठाण : तळशेत ते शिरोली-पाईंट रस्ता ( ता.खेड ) या मार्गाचे पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण आणि नुतनीकरणाचे काम सुरू आहे. परंतु करंजविहिरेच्या तळशेत भागात मुख्य रस्त्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना गटारातून प्रवास केल्याचा अनुभव येत आहे. रस्त्याच्या कडेला नागरिकांच्या आडमुठेपणामुळे पावसाचे पाणी निघून जात नाही त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहे. याचे दुष्परिणाम प्रवासी नागरिकांना भोगावे लागत आहे.