
पुणे : ठेकेदारांकडून नाले सफाई करताना नाल्यातील गाळ नाल्यातच टाकत असल्याचे नागरिकांना दिसत आहे, त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. तरीही महापालिकेचे प्रशासन ठेकेदारांना धडा शिकविण्यास तयार नाही. आज (ता. २४ ) सहकारनगर येथील फुलपाखरू उद्यानाजवळ आंबिल ओढ्यात पोकलेनेने थेट नाल्यातच गाळ टाकला जात असल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.