पुणे - बाजार समितीमध्ये रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत व्यक्तीचा मृत्यू

पुणे - बाजार समितीमध्ये रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत व्यक्तीचा मृत्यू
Published on: 

बाजार समितीत रुग्णवाहिकेच्या
प्रतीक्षेत व्यक्तीचा मृत्यू

पोटदुखीने विव्हळणाऱ्या व्यक्तीला वेळेत मिळाली नाही वैद्यकीय मदत

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारालगत असलेल्या गणपती मंदिरालगत पोटदुखीने विव्हळणाऱ्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही दुदैवी घटना सोमवारी (ता.१९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजार समितीमधील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणेबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तेव्हा देखील बाजार समितीची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.१९) सकाळी दहाच्या सुमारास जय शरद गजानन मंदिरात आरती सुरू होती. त्याचवेळी एक व्यक्ती पोटात तीव्र वेदना होत असल्याचे सांगत मंदिरासमोर बसली होती. संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तेथे असलेल्या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. संबंधित व्यक्तीचा मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आल्याचे फळ विभाग प्रमुख नितीन चौरे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, मार्केट यार्डात आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष गरजेच्या वेळी ही रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
----
चौकट -
अधिकाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकांकडे बोट?
या घटनेची माहिती बाजार समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सुरक्षा रक्षकांना कळविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com