भीमाशंकर कारखान्याने कोरोनोच्या पार्श्वभुमीवर दिली रुग्णवाहिका 

सुदाम बिडकर
Sunday, 13 September 2020

दत्तात्रयनगर, (पारगाव) ता. आंबेगाव येथिल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एक रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पारगाव : दत्तात्रयनगर, (पारगाव) ता. आंबेगाव येथिल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एक रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या रुग्णवाहीकेचे लोकार्पण कारखाना स्थळावर नुकतेच कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उपायासाठी कारखान्याच्या वतीने सुसज्ज अशी रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या रुग्णवाहीकेचा फायदा पंचक्रोशीतील रुग्णांना होणार असल्याने नागरीकांकडुन समाधान व्यक्त होत आहे. लोकार्पणप्रसंगी पुणे जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक शांताराम हिंगे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, ब्रिजेश लोहोट, पोपटराव घोलप, किरण शिंदे उपस्थित होते.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambulance provided by bhimashankar factory in the background of Corono