‘ॲमिनिटी’चा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन - महापौर मुरलीधर मोहोळ

ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वाने देण्याच्या विषयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मंगळवारी एक पाऊल मागे घेतले
Amenity space
Amenity spacesakal

पुणे : ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वाने देण्याच्या विषयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मंगळवारी एक पाऊल मागे घेतले. ‘‘शहरातील सर्व राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकरांना विश्वासात घेऊनच हा विषय मंजूर करण्यात येईल,’’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ॲमिनिटी स्पेसवरून शहरात गोंधळ सुरू आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २२) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. या प्रस्तावाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.

मोहोळ म्हणाले, ‘‘हा निर्णय सार्वजनिक हितासाठी आहे. तो पारदर्शिपणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला. पुणेकरांच्या मनात कोणतीही शंका न ठेवता ॲमिनिटी स्पेसचा सकारात्मक निर्णय घ्यायचा आहे. सर्व राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकर यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल.’’ मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्यस्त्रोत आहे. उत्पन्न वाढीचे स्त्रोत वाढविणे नजीकच्या भविष्यासाठी अपरिहार्य आहेत. त्यासाठी महापालिकेच्या ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून मिळालेले उत्पन्न शहरातील महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांसाठी वापरला जाणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

Amenity space
मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसला - देवेंद्र फडणवीस

ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देणारी पुणे राज्यातील पहिली महापालिका नाही. याआधी ठाणे, सिडको, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी याच पद्धतीने ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नाचा नवीन मार्ग तयार केला आहे. ठाणे, ‘पीएमआरडीए’मध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. तसेच, ‘पीएमआरडीए’वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तेथे या पक्षाच्या नेत्यांची जागांचा भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता आहे. मात्र, पुण्यात विरोध आहे. अशी दुटप्पी भूमिका का, असा सवाल मोहोळ यांनी केला.

Amenity space
बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी

दृष्टिक्षेपात ॲमिनिटी स्पेस...

महापालिकेच्या ताब्यातील जागा

८५६

प्रत्यक्ष वापर सुरूअसलेल्या जागा

५८६

-----------------------------------------

शिल्लक

१८५

आरक्षित

८५

------------------------------------------

सर्वसाधारण सभेत प्रस्तावित केलेल्या जागा

२७०

२७० ॲमिनिटी स्पेसचे एकूण क्षेत्रफळ

१२३ एकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com