Sakal Lit Fest: वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास मुक्त व्हावा ;प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांचे मत; दिल्लीकेंद्री मांडणीस विरोध

Sakal Lit Fest : भारतीय इतिहासाची मांडणी वसाहतवादी दृष्टिकोनातून झाल्याची टीका करत लेखक अमिश त्रिपाठी यांनी प्राचीन भारताच्या सागरी व्यापार, हस्तलिखिते आणि विविध साम्राज्यांच्या इतिहासाला योग्य स्थान देण्याची गरज व्यक्त केली.
Author Amish Tripathi speaks at the Sakal Lit Fest in Pune.

Author Amish Tripathi speaks at the Sakal Lit Fest in Pune.

esakal

Updated on: 

पुणे : ‘‘शालेय पाठ्यपुस्तकांमधून आपल्याला नेहमीच युरोपीय किंवा वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास शिकविण्यात आला. त्यात भारत हा केवळ शेती करणारा आणि परकी आक्रमणांचा वाट पाहणारा देश होता, असे चित्र मांडण्यात आले. प्रत्यक्षात आपण प्राचीन काळी प्रमुख सागरी प्रवासी आणि व्यापारी होतो. आता त्यामुळेच भारतीय इतिहासाची मांडणी वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांनी आज केले.

Loading content, please wait...