esakal | खंबीर राहणे हेच गुणकारी औषध

बोलून बातमी शोधा

Amit Munot
खंबीर राहणे हेच गुणकारी औषध
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा सुरुवातीला काही दिवस त्रास जाणवला. त्यानंतर बरे वाटले. मात्र कोरोनाची लागण झाल्यापासून तो बरा होर्इपर्यंत डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचार तसेच स्वतः खंबीर राहात घाबरून न जाणे गरजेचे आहे. या आजारावर त्याहून दुसरे गुणकारी औषध कोणतेच नाही. त्यामुळे या काळात गडबडून न जाता योगासने व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग्य त्या सर्व बाबी केल्या, असा अनुभव अमित मुनोत यांनी सांगितला.

मुनोत यांचे लक्ष्मी रस्त्यावर साड्यांचे दुकान आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी घरीच उपचार घेत कोरोनावर मात केली. ते म्हणाले, ‘‘ताप आल्याने कोरोनाची टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता कुटुंबाचे काय होणार, असा प्रश्‍न पडला. घरात ज्येष्ठ आई-वडील व दोन लहान मुले व पत्नी आहे. मात्र सुदैवाने त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनाकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात, याची कल्पना होती. त्यामुळे घरीच वेगळे राहून उपचार सुरू केले. कोरोनाविषयक औषधे, योगा, चांगला आहार आणि त्यासह रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्‍यक ते सर्व सुरू ठेवले. त्यामुळे कोरोनातून बाहेर आलो.

...तर अर्ध्या रात्री फोन करा

घरीच उपचार सुरू असल्याने डॉक्टरांशी प्रत्यक्ष बोलणे झाले नाही. आमच्याच सोसायटीत राहणारे डॉ. अमित वाळिंबे व डॉ. राहुल कुलकर्णी यांनी माझ्यावर उपचार केले. ‘टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काहीही होणार नाही. त्रास झालाच तर अगदी मध्यरात्री फोन करा,’ असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे मोठा धीर मिळाल्याचे मुनोत यांनी सांगितले.