
पुणे : पुण्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी रात्री ११च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.