
अमित शहा यांचेकडून हर्षवर्धन पाटील यांचे सहकारातील महत्व अधोरेखित
इंदापूर - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रवरानगर येथील सहकार परिषदेत (Cooperation Conference) माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे राज्यातील सहकार चळवळीतील योगदानाचे महत्व अधोरेखित झाले. त्यामुळे भाजपा हर्षवर्धन पाटील यांना ताकद देणार का याची चर्चा इंदापुरात रंगली.
देशातील पहिली सहकार परिषद प्रवरानगर येथे शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुढाकाराने संपन्न झाली. परिषदेत अमित शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केल्याने इंदापूरात समाधानाचे वातावरण आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वेळा नवी दिल्ली येथे देशाचे प्रथम सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेवून सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी त्यांच्याशी अभ्यासपुर्ण संवाद साधला आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांनी भाषणात श्री. फडणवीस,श्री. विखे पाटील ,श्री. पाटील यांच्याशी सहकार व साखर उद्योगावर होत असलेल्या संवादाचा आवर्जून नामोल्लेख करत महाराष्ट्रातील सहकारीसाखर उद्योगाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगास दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: पुणे : सहा महिने आधीच शहांनी फोडला महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ
राज्य मंत्रिमंडळात सलग ८ वर्षे सहकारमंत्री पद भूषविलेले हर्षवर्धन पाटील हे राज्यातील पहिलेच नेते आहेत. तत्पूर्वी पणन मंत्रीम्हणून त्यांनी आपल्या कामाचा देश पातळीवर ठसा उमटवला आहे. माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांना गावपातळीपासून सहकार क्षेत्रात काम करण्याचा तब्बल ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. या जोरावर हर्षवर्धन पाटील सहकार चळवळ सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांना राजाश्रय असल्याचे अमित शहा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
Web Title: Amit Shah Emphasizes Importance Of Harshvardhan Patil Cooperation Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..